उत्तर भारतातील थंडीच्या लाटेचा परिणाम मराठवाड्यावर झाला आहे. ब-याच दिवसांपासून गायब असलेल्या थंडीने मराठवाड्यात जोरदार आगमन केले आहे. शनिवारी महाराष्ट्रातील सर्वात नीचांकी तापमान ३.० अंश सेल्सिअस इतके लातूरच्या निलंगा तालुक्यातील औराद येथे नोंदले गेले आहे, त्यामुळे औराद चांगलेच गारठले आहे. शिवाय परभणीतही ४.८ इतके कमी तापमानाची नोंद झाली असून जिल्ह्यात हुडहुडी भरली आहे.अशी माहिती वनामकृविचे तापमान विभाग प्रमुख शेख यांनी दिली आहे. नांदेडमध्येही पारा ७.३ अंशावर गेला असल्याने थंडीत वाढ झाली आहे. अशी माहिती श्रीनिवास औंधकर यांनी दिली आहे.
शनिवारी थंडी कायम होती. शुक्रवारपासून वा-याचा वेग वाढला असून ५.५० किमी प्रति तास या वेगाने वाहत आहे. त्यामुळे थंडीत भर पडली आहे. वाढलेली थंडी गहू पिकासाठी पोषक आहे. मात्र ज्वारीवर चिकटा पडण्याची शक्यता आहे. शनिवारी पहाटे तापमानात मोठी घट झाली होती. त्यामुळे पहाटे मॉर्निंग वॉकसाठी जाणा-यांची संख्या रोडावली आहे. जिल्ह्यात आणखी चार दिवस थंडीचा कडाका राहणार असल्याची शक्यता कृषि हवामान विभागने वर्तविली आहे. त्यामुळे जिल्हाभरात थंडीची हुडहुडी कायम राहणार आहे. वातावरणात बदल झाला असून थंडीने लोक हैराण झाले आहेत.मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील नागरिकांना भरदुपारी देखील अंगात स्वेटर, कानाला मफलर व डोक्याला टोपी चढवून फिरावे लागत आहे.
उत्तर भारतातील थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात हुडहुडी वाढली आहे. मराठवाड्यातील तापमानात झपाट्याने घट होत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात नोंदवले गेलेले किमान तापमान असे आहे, लातूर जिल्ह्यातील औराद येथे सर्वाधिक कमी ३.० अंशावर पारा गेला आहे. तसेच परभणीतही थंडी कडाका वाढला आहे, येथील तापमानाचा पारा ४.८ अंशावर गेला आहे. त्यामुळे परभणीकरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. नांदेडमध्येही तापमान ७.३ अंश इतके नोंदविले गेले. उस्मानाबाद ८.५, औरंगाबाद ११ अंश, लातूर १२, हिंगोली ११, जालना १३ आणि बीडमध्ये १४ इतके तापमान नोंदवले गेले आहे.
अपेक्षेनुसार २४ डिसेंबरपासून मराठवाड्यातील तापमान कमी होण्यास सुरूवात झाली. त्यामुळे थंडीचा जोर एकदम वाढला. २५ आणि २६ डिसेंबरला ब-याच भागात किमान तापमान १० अंशाच्या खाली गेले जे यंदाच्या हिवाळ्यात पहिल्यांदाच इतके कमी झाले आहे. पुढील काही दिवसांत थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. परभणीत सलग तीन दिवसांपासून तापमानात घट होत आहे. शुक्रवारी परभणीचे तापमान १० अंश सेल्सिअस होते.

0 Comments