आमच्या त्रिरत्न युवा मंच संस्थेचे संस्थापक बुध्द वाशी दिपक सूर्यवंशी सर यांच्या प्रथम स्मृती दिनी विनम्र अभिवादन..
त्यांचे कार्य क्षेत्र असलेल्या जिल्ह्यामध्ये सर नी गाव खेडे पिंजून काढून सर्व निलंगा तालुक्यातील सर्व बुद्ध विहारे एकमेकांशी जोडले. गावा गावा मध्ये संवाद निर्माण केला.
आंबेडकरी चळवळीमध्ये दिपक सूर्यवंशी सरांचे खुप मोठे योगदान आहे हे तुम्हा आम्हा सर्वानाच माहिती आहे. गरीब कुटुंबात जन्माला आल्या मुले त्यांना तळागाळातील व्यक्तीची, सामान्य कार्यकर्त्यांची जान होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुध्द यांच्या विचाराने प्रेरित होऊन सरांनी ग्रामीण भागामध्ये धम्म चळवळीच्या कामाला गती देण्याचे उत्तम कार्य केलेले आहे.
‘डिजिटायझेशन ऑफ आंबेडकराईट मुव्हमेंट’ ह्या कार्याच्या सिद्धी साठी सरांचे खूप मोठे योगदान आहे. www.brambedkar.in ह्या वेबसाईट च्या माध्यमातून बाबासाहेब, गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या विषयी ची सर्व माहिती जगाच्या कानाकोपऱ्यात पाहोंचली पाहिजे ह्यासाठी दीपक सर यांनी खूप शर्तीचे प्रयत्न केले.
त्रि रत्न युवा मंच संस्थेचे संस्थापक बु. दिपक सूर्यवंशी सर, यांचा प्रथम पुण्य-स्मरण दिनाचा कार्यक्रम दि. १ मे रोजी, औराद, शा. येथे.
Posted by Triratna Yuva Munch on Tuesday, 26 April 2022
0 Comments