Hot Posts

6/recent/ticker-posts

औराद शहाजानीत ३ दिवसाकरिता जनता कर्फ्यू


आज औराद शहाजानी येथे एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. सदर रूग्ण व त्याच्या संपर्कात येणाऱ्या लोकाबाबत प्रशासन योग्य ती काळजी घेत आहे.

त्या रुग्णाने औराद येथील खाजगी रुग्णालयात ट्रीटमेंट घेतली असून तो गावातही फिरला आहे. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी औराद शहाजानीत जनता कर्फ्यू लागू करणे आवश्यक आहे. 

औरादला कोरोनाच्या आणखी संक्रमणापासून दूर ठेवण्याकरिता औराद येथील संपूर्ण बाजारपेठ दि. *२१,२२,२३ (रविवार,सोमवार, मंगळवार) या तीन दिवशी कडेकोट बंद राहील व जनता कर्फ्यू पाळण्यात येईल.*
यामध्ये पाणी, दुध, दवाखाना, मेडीकल यांना सूट असेल.

*घरीच रहा, सुरक्षित रहा....*

Post a Comment

0 Comments