या महाविद्यालयात केवळ नऊ महिने सेवा राहिली. त्यानंतर ही तेरणाकाठची वास्तू सोडून जावं लागणार आहे! त्याचबरोबर ३० वर्ष तुटून राहिलेल्या गावच्या मातीला भेटण्याची आसही लागली आहे.
या वास्तूला गदिमा, लतादीदी, हृदयनाथजी, मीनाताई, सुरेश वाडकर, हरिश भिमानी, नितीन मुकेश अशा अनेकांचे पदस्पर्श झाले. अनेक कलावंतांनी आपल्या संगीताचं औरादकरांना दर्शन घडविलं. या वास्तूच्या रुपानं आर्ष कलावंत दीनानाथ मंगेशकर यांचं नाव महाविद्यालयाला लाभलं.
आजूबाजूच्या परिसरातील अनेक मुलामुलींसाठी त्या काळात शिक्षणाची दारं उघडली गेली. अलविदा करण्याची वेळ वरचेवर जवळ येत चालल्यानं जीवाला हुरहुर लागली आहे🌿

शब्दांकन : सुरेंद्र रावसाहेब पाटील, औराद शा.
0 Comments